काही
असे लोक भेटतात, की त्यांच्या दृढनिश्चयाला नमस्कार करावासा वाटतो. सख्खे बहिणभाऊ
एकमेकांशी तीस-तीस वर्षे बोलत नाहीत. भाऊ भावाला बोलत नाहीत. रोज सोबत काम करतात, पण एकमेकांचं
तोंड पाहत नाहीत. चार बंध ओलांडून दुसर्याकडे दुपारची भाकर खायला जातील, पण शेजारी
भावाजवळ जाणार नाहीत. संध्याकाळी गप्पा मारायला चार गल्ल्या ओलांडून जातील, पण
घरातल्यांशी प्रेमाने बोलणार नाहीत. बरं आपण एकमेकांशी बोलत नाहीत, याची बोच असावी
की नाही? उलट आम्ही एकममेकांशी कसे किती दिवसांपासून बोलत नाहीत, या गोष्टी
काहीतरी पराक्रम केल्यासारख्या सांगितल्या जातात. वीस वर्षे झाले आम्ही एकमेकांच
तोंड पाहिलं नाही, असं लोकांत सांगताना यांना कोण आनंद होतो, देव जाणे.
leave-anger |
बोलत नसाल, पण त्याची आठवण मनातल्या मनात जपताच की नाही? फोन करताना सुध्दा त्याचा फोन आला तर बोलेन. मी स्वत:हून करणार नाही. अशी काहींची भूमिका असते. त्याचा आल्यावर जर बोलणारच असाल तर, तुम्ही करून बोललं, तर काय आकाश कोसळणार आहे? बर्याच वेळा ज्याच्याशी अबोला धरता, तो अचानक सगळं सोडून निघून जातो. मग त्याच्यासोबतच्या कोणत्याही संबंधाला तसा काहीही अर्थ उरलेलला नसतो. केवळ पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातात काहीच उरत नाही.
मी होऊन कसा बोलू, हा संकोच सोडा. असं करणं कठीण आहे, पण हिताचं आहे. एकदिवस सगळे रागलोभ इथंच ठेऊन जायचं आहे. जीवन क्षणभंगूर आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. माऊली म्हणतात, आणि शरीरजात हे आघवें । हें नाशवंत स्वभावें । म्हणोनि तुवा झुंजावें । पंडुकुमरा ॥ ज्ञा.२.१३६ ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा.
आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्राचे विचारदुर्ग |
आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा
1 टिप्पण्या
खरं आहे तुमचं 👍
उत्तर द्याहटवा