smaran-dnyan-suryache |
असा एखादा युगंधर
कोणे एकोकाळी या पृथ्वीतलावर आस्तित्वात होता, याच्यावर कदाचित भविष्यातील
पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. पण आम्ही भारतीय आभिमानाने सांगू शकतो, असा
युगपुरूष या भारतभूमीत होऊन गेलाय.
त्यांच्या कार्याला सीमा नाहीतच खरंतर! राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,
न्यायशास्त्र, तत्वज्ञान या एकेका क्षेत्रातील योगदानासाठी लोकांना नोबेल पुरस्कार
मिळतात. त्या प्रत्येक क्षेत्रातील बाबासाहेबांचं कार्य बघितलं की, छाती आभिमानाने
फूलून येते. शिर भक्तीभावाने लीन होते. पण त्यांची योग्यता कळण्यासाठीची पात्रता
आम्हा भारतीयंकडे आहे का? विद्वानेव विजानाति विद्वज्जनपरिश्रमम् । न हि
वन्ध्या विजानाति गुर्वीं प्रसववेदनां ।। विद्वानाची योग्यता विद्वानालाच कळत
असते. वंध्येला प्रसववेदनांचं दु:ख कळत नसतं. जगातल्या सर्वच क्षेत्रातल्या
विद्वानांनी या महानायकाबद्दल काढलेल्या उद्गारांवरून नजर फिरवल्यास याची प्रचिती
येते.
भारतरत्न डॉ
बाबासाहेब आंबेडकर म्हणजे गेल्या शतकाला पडलेलं गोमटं स्वप्नं. अशी स्वप्ने समाजपुरुषाला
वारंवार पडत नसतात. म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती काळजाच्या कुपीत
बंदिस्त करून आपल्या मनाचा गाभारा सुगंधित करायचा असतो. त्यांच्या ज्ञानसाधनेची
तुलनाच होऊ शकत नाही. गगनं गगनाकारं सागर सागरोपम। गगनाला गगनाचीच आणि
सागराला सागराचीच उपमा. त्यांच्या बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या शीर्षभागी माऊलींची
वचने असायची, तर मूकनायकाच्या शीर्षस्थानी तुकोबांची. तसंच जीवनपथाच्या वाटचालीत
आम्ही त्यांचं संविधान मस्तकावर धारण करणं आवश्यक आहे. बाबासाहेबांचा ज्ञानयोग हाच
त्यांचा कर्मयोग होता. त्यांचं स्मरण करताना आपणही अखंडीत ज्ञानसाधनेचा संकल्प
करूया. ज्ञानच सर्वश्रेष्ठ धन आहे. ज्ञानाने मन निर्मळ होतं. अमृताच्या चवीची
तुलना करता येत नाही, तसं ज्ञानामृतही अतुल्य आहे. माऊली म्हणतात, जैसी अमृताची
चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि
॥ ज्ञा. ४. १८३॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा.
आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठीयेथे क्लिक करा.maharashtrache-vichardurg
आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा
0 टिप्पण्या