तुमच्या अचेतन मनाची शक्ती - जोसेफ मर्फी

 

कल्पतरू तळवटी । जो कोणी बैसला ।। काय वाण त्याला । सांगा जो जी ।। असं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. फक्त त्या कल्पतरूचा पत्ता मिळाला पाहिजे. त्याचा पत्ता संतांनी आम्हाला कधीचाच देऊन ठेवलाय पण संतांना आम्ही एका ठराविक चौकटीत बंद करून रानभरी झालो आहोत. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, तुझे आहे तुजपाशी परि तु जागा चुकलासी।। ती चुकलेली जागा शोधण्याचा प्रयत्न या लेखातून करूया.

the power of your subconscious mind (original version),The power of your subconscious mind experience
power-your-subconscious-mind


            सध्या सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तकांची बाजारात फारच चलती आहे. जॅक कॅनफिल्ड, ब्रायन ट्रेसी, रॉबीन शर्मा, र्होन्डा बायर्न या मांदियाळीत अग्रस्थानी झळकणारं नाव म्हणजे जोसेफ मर्फी. त्यांचं नुकतंच पॉवर ऑफ युवर सबकॉन्सियस माईंड हे पुस्तक वाचण्यात आलं. मानवी जीवनाला एका अकल्पित उंचीवर  नेण्याचं सामर्थ्य या पुस्तकामध्ये नक्कीच आहे. त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

            जगात प्रत्येकाला सुख हवंय. साधी गाडी असली तरी ब्रॅंडेड गाडी हवीय. जगातली सर्वांत सुंदर व्यक्ती स्वत:च्या मालकीची हवीय. मोठा बंगला हवाय. सर्वांची हीच  अपेक्षा असते. पण काहींनाच ते मिळतं. बाकी नव्यान्नव टक्के लोकांना यातलं काहीही मिळत नाही. असं का होत असावं? अपेक्षा सर्वांचीच असते. पुर्ती मात्र मोजक्यांच्याच वाट्याला येते. असं का? याच्या पाठीमागच्या मनोवैज्ञानिक कारणाचा उलगडा या पुस्तकात होतो. पुस्तकाचं नाव आहे- पॉवर ऑफ युवर सबकॉन्सियस माईंड.

मानवी मनामध्ये अफाट सामर्थ्य आहे. जगातली कोणतीही गोष्ट त्याला अशक्य नाही. फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे.   मानवी जीवनातील विविध गुंते सोडवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी मनाच्या या शक्तीचा वापर कसा करून घेतला याविषयीची खूप सारी उदाहरणे या पुस्तकात वाचायना मिळतात. त्याचा मराठी अनुवाद प्रा. पुष्पा ठक्कर यांनी केला आहे. आजच्या नकारात्मक वातावरणात अशा विचारांची आपणा सर्वांनाच फार गरज आहे म्हणून हा लेखन प्रपंच.

मानवी मनाचे दोन भाग

मानवी मनाचे चेतन आणि अचेतन असे दोन भाग आहेत. आपल्या जीवनातील दृश्य व्यवहार ज्याद्वारे केले जातात ते चेतन मन. या चेतनाला नियंत्रित करणारे, पण अदृश्य असणारे अचेतन मन. सकारात्मक, नकारात्मक, बरं वाईट  यातला भेद चेतन मनाला समजतो; पण अचेतन मनाला यातलं काहीही कळत नाही. ते सर्वग्राही आहे.त्याला आपण ज्या प्रकारे आदेश देऊ त्याप्रकारे कृती घडवून आणण्याचं काम हे अचेतन मन करतं. ते चूक किंवा बरोबर याबाबतचा वाद घालत बसत नाही. ते त्याला मिळालेल्या प्रत्येक विचारावर प्रक्रिया चालू करतं आणि तसा परिणाम काही दिवसांत आपल्यासमोर ठेवतं. त्यामुळे त्याला आपण कळत नकळतपणे कुठल्या कमांड देतो याविषयी आपण सजग असणे अत्यंत आवश्यक आहे.

हेन्री फोर्ड म्हणतात, “ एखादी गोष्ट शक्य आहे, किंवा एखादी गोष्ट अशक्य आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा दोन्हीही वेळा तुम्ही बरोबर आसता.”  त्यांच्या या म्हणण्यामागचे कारणच हे आहे. जहाजाचा कॅप्टन म्हणजे चेतन मन. त्याच्या सुचनेनुसार जहाज चालवलं जातं, पण तो चालवत नाही. चालवणारा स्टाफ वेगळा असतो,पण त्यांना काही दिसत नसतं. ते कॅप्टनच्या सुचनेप्रमाणे काम करत असतात. ते त्याला प्रश्न विचारत नाहीत. कॅप्टनची सुचना चुकली तर जहाजाचा कपाळमोक्ष ठरलेलाच. त्याप्रमाणे चेतन मन जर चुकीचे आदेश देईल तर आपल्या जीवनातही आपल्याला चुकीचेच अनुभव येणार.

वैद्यक शास्त्रामध्ये मनाच्या या सामर्थ्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला गेलेला आहे. तिथे प्लेसिबो इफेक्ट नावाची एक संकल्पना आहे. ज्यामध्ये रोग्याला रिकामीच गोळी दिली जाते आणि सांगितले जाते की तुला अत्यंत प्रभवी औषध दिले आहे , तू  नक्की बरा होणार. आश्चर्याची बाब म्हणजे तो रोगी ठणठणीत बरा होतो. याविषयीची अनेक उदाहरणे लेखकाने या पुस्तकात दिली आहेत.

त्याचबरोबर नोसिबो इफेक्ट नावाची एक संकल्पना आहे. त्यामध्ये निरोगी व्यक्तीला तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की तुला हा रोग झालेला आहे. आता तुझं काही खरं नाही. आश्चर्याची बाब म्हणजे त्या रोगाची सर्व लक्षणे त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात.

या दोन्ही संकल्पनांमध्ये औषधाशिवाय रोग निवारण करणारी आणि कारणाशिवाय रोग घडवून आणणारी शक्ती कोणती? त्या शक्तीचं नाव, आधुनिनक मानसशास्त्राच्या भाषेत- पॉवर ऑफ युवर सबकॉन्सियस माईंड. श्रध्दावान लोक त्याला ईश्वर म्हणतात. आधुनिक मानसशास्त्र त्याला अचेतन मन म्हणते. नाव काहीही असले तरी शक्ती मात्र तीच आहे.  

कोणताही विकार बरा

आपल्याच सबकॉन्सियस माईंड च्या असीम शक्तीमुळे तीन किलो  वजनाचे आपले शरीर ऐंशी किलोचे होते. जर त्याच्यामध्ये हे शरीर बनवण्याची ताकद आहे तर त्या शरीरामध्ये निर्माण झालेली कोणतीही समस्या दूर करण्याचे सामर्थ्यही नक्कीच आहे. हा दृढ विश्वास हवा. आपल्याच मनाच्या चुकीच्या विचार करण्याच्या पध्दतीमुळे आपण आजार घडवून आणतो. गीतेने मांडलेला विचारच लेखक येथे पुन्हा अधोरेखित करतात. गीता सांगते, “ आत्मैव आत्मना बन्धु: आत्मैव रिपुरात्मना:”

आता यावर उपाय काय? यावर उपाय हाच. जसा चुकीचा विचार करून रोग घडवून आणला तसा बरोबर विचार करून तो रोग नष्ट करवून टाकायचा. आता हे कसं करायचं याच्या साधारण आठ पध्दती जगाताल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या अनुभवावर आधारित लेखकाने सुचविल्या आहेत. त्या सविस्तरपणे पुस्तकातच वाचावयास हव्यात.

उदाहरणादाखल एक सांगतो. तशी ती सर्वपरिचित आहे. स्वयंसूचन. डॉक्टर जसा सकाळ, दुपार, संध्याकाळ औषधाचा डोस देतात, अगदी त्याप्रमाणे दिवसातून तीन वेळा निवांत वेळ काढून आपणच आपल्या मनाला सुचना द्यायची. या स्वयंसूचनाची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आणि रात्री झोप लागण्यापुर्वी. कारण या दोन्ही वेळी मनावर सुस्ती चढलेली असते. बाहेरचे विचार कमी झालेले असतात. त्यामुळे त्या स्वयंसुचनावर मन अधिक प्रभावीपणे  प्रक्रिया करते. अशाच प्रकारची वेळ दुपारीही  निवडून तुम्ही मनाला सकारात्मक सुचना देऊ शकता.

किती दिवसात फरक पडतो? 

आता हे मात्र प्रत्येकाच्या विचाराच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. शक्यतो तीन आठवड्यात फरक पडतो असा अनेकांचा अनुभव आहे.काहींना त्या आगोदरही परिणाम दिसतात. अर्थात त्यासाठी त्यावर प्रगाढ विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. कदाचित त्यामुळेच अडाणी गावंढळ लोक लवकर ठिक होतात आणि अति शहाणे वाया जातात. कारण त्यांच्या मनात संशय असतो. म्हणूनच कदाचित गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगत असावेत,“संशयात्मा विनश्यति।” संशय घेणार्याचा सर्वनाश होतो.

त्यासाठी काय काळजी घ्यावी?

 या तंत्राचा अवलंब करताना त्यावर प्रगाढ विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही मनाला सकारात्मक स्वयंसूचन केले आणि तात्काळ त्याच्या विरोधात विचार जर तुमचे मन करत असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंसुचनाचा परिणाम शुन्यवत करता. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

संशोधकांनी केला उपयोग

विविध शोध लावणार्या संशोधकांनी याच तंत्राच्या साहाय्याने आपले संशोधन यशस्वीरित्या सिध्द केले आहे. या विषयीची अनेक उदाहरणे या पुस्तकात आपणांस वाचावयास मिळतील. त्यांचा इथे उल्लेख करून तुमची पुस्तक वाचण्यातली मजा मी हिरावून घेणार नाही.

प्रतिभावंत आणि अचेतन मन

The power of your subconscious mind review,The power of your sub-conscious mind paperback 1 December 2015
power-your-subconscious-mind


इथेही पुन्हा मी नावे घेत नाही; पण ही यादीदेखील फारच मोठी आहे. यात आपणा सर्वांचा आवडता शेक्सपीयर देखील येतो. अचेतनाच्या साहाय्याशिवाय अफाट, अचाट काही घडूच शकत नाही अशी या सर्व प्रतिभावंतांची श्रध्दा आहे. कारण त्या सर्व समर्थ शक्तीला अशक्य काहीच नाही. जगात काहीही घडू शकतं. अशक्य काहीच नाही याचा परिचय या प्रतिभावंत लेखक, संगीतकार यांची उदाहरणे वाचल्यावर आपल्याला येतो.

सारांश

मानवाला काहीही अशक्य नाही फक्त दृढ भाव असावा. आरोग्य, व्यवसाय, आर्थिक उन्नती, किर्ती, सुडौल शरीर, काहीही प्राप्त होऊ शकतं फक्त श्रध्दा हवी. प्रार्थनेत विश्वास असावा. व्यासांपासून तुकोबांपर्यंत आमच्या सर्व संतांनी हेच तर ओरडून ओरडून सांगितलंय. फक्त ते त्या शक्तीला विठोबा म्हणतात. जोसेफ मर्फी त्याला पॉवर ऑफ युवर सबकॉन्सियस माईंड म्हणतात.

The power of your subconscious mind summary,The Power of your subconscious mind wiki
power-your-subconsciou-mind


        ईश्वर,अल्ला, येशू, बुध्द काहीही म्हणा शक्ती तीच आहे. फक्त  आम्हाला इंग्रजीत असलं की जास्त लवकर पटतं. त्यात आपली काहीच चूक नाही. कारण राजकीय गुलामी संपली तरी मानसिक गुलामी आहेच ना. असो.

 वैयक्तिक जीवनात यशाचे सोपान चढण्यासाठी नक्कीच हे पुस्तक तुम्हाला लाभदायक ठरेल. नक्की वाचा. हे खरं असेल का? असले वांझोटे प्रश्न विचारण्यापेक्षा हे प्रयोग करून पाहा, मग ठरवा. हे पुस्तक नक्की वाचा. या लेखाबद्दल तुमचा कसाही अभिप्राय असला तरी नक्की प्रतिक्रिया कळवा. एक विनंती,आयुष्यात किमान एकदा गीता नक्की वाचा.

Have a happy reading.



                     आमचे हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा.



टिप्पणी पोस्ट करा

13 टिप्पण्या

  1. खूपच सुंदर माहिती मिळाली या लेखाच्या माध्यमातून...
    वाघ सर.. आमच्या ज्ञानात भर पडली!

    उत्तर द्याहटवा
  2. श्री वाघ सरांनी ' पॉवर ऑफ सबकॉन्शस माईंड ' या पुस्तकाविषयी व त्यातील आशयाविषयी अतिशय सुंदर विवेचन केले आहे. आणि सामान्य जीवनात त्याचा उपयोग कसा करून घेता येईल याविषयी उदाहरणांसह माहिती दिली आहे. लेख आवडला.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान सर..खरतर आपलं आपल्या मनावर जर कंट्रोल असेल तर या जगात काहीच अशक्य नाही अन आपले मन जर प्रसन्न असेल तर आपणही ताजेतवाने राहू...👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. मोबाईल वर मी खूप दिवसांपासून असेच काहीतरी मेंदूसाठी विचारांचे खाद्य शोधत होतो, मला वाटतं आज ते मला मिळालं... खुप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  5. 👌चंचल अशा मनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा लेख.लेखनाचा मतितार्थ लक्षात घेतल्यास व त्याचे प्रत्यक्ष अनुकरण केल्यास जीवन हा एक रम्य प्रवास नक्कीच होईल."मन की हारे हार है,मन की जीते जीत!"👍अप्रतिम मनाची मशागत.🙏😊धन्यवाद!🙏

    उत्तर द्याहटवा
  6. How To Make Money On Sports Betting
    Online kadangpintar sports betting is available for a whole host of US and European sports betting markets. Some US states, like https://septcasino.com/review/merit-casino/ Louisiana งานออนไลน์ and poormansguidetocasinogambling.com New Jersey, allow

    उत्तर द्याहटवा